नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 99999999999 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का! – तेज खबर

तेज खबर

Latest Online Breaking News

Medical कॉलेजचा पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी होणार सुरू; राज्यभरातील विद्यार्थ्यांना सुखद धक्का!

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
[google-translator] [simple-author-box]

नाशिकः राज्यभरातील विद्यार्थ्यांना एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी. वैद्यकीय (Medical) महाविद्यालयाचा (College)पदव्युत्तर अभ्यासक्रम यावर्षी सुरू होणार आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन संस्थेच्या कामकाजाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण, डेप्युटी रजिस्टार डॉ. एस. एच. फुगरे आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

आठ दिवसांत नियोजन सादर करा

बैठकीत पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील जागा वितरणाबाबत शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका व इमारत बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधून येत्या आठवड्यात सर्व आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. त्याचप्रमाणे या विद्यालयाच्या इमारतीचे डिझाइन नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्याअंतर्गत सर्व अद्यावत सेवा सुविधा उपलब्ध असाव्यात, अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंक्लर, हिरवळ याबाबींचा देखील नवीन इमारतीत करण्यात यावा, याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असेल. याबाबतचे नियोजन तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

लासलगाव रस्त्याबाबत सूचना

लासलगाव बाह्यवळण रस्ता भूसंपादनाबाबत रेडिकेनर दरानुसार सर्वांना समान तत्वावर जमिनीचा मोबदला देण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल, अशा सूचना पालकमंत्री भुजबळ यांनी दिल्या आहेत. याबैठकीत लालसगाव, विंचूर व टाकळी विंचूर या गावातील शेतकरी समवेत भूसंपादन करण्यात येणाऱ्या जमिनीच्या मोबदला दराबाबत चर्चा केली. याबैठकीस उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दीपाली पाटील व सहाय्यक नगररचनाकार सतीश चव्हाण आदी उपस्थित होते.

मेडिकल कॉलेजचे इमारतीचे डिझाइन नियोजनबद्ध असणे आवश्यक आहे. तसेच त्याअंतर्गत सर्व अद्यावत सेवा सुविधा उपलब्ध असाव्यात, अग्निशमन यंत्रणा, स्प्रिंक्लर, हिरवळ याबाबींचा देखील नवीन इमारतीत करण्यात यावा. याबाबतचे नियोजन तयार करून येत्या आठ दिवसांत सादर करावे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space

[wonderplugin_carousel id="1"]

मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
[responsivevoice_button voice="Hindi Female"] Visit counter For Websites