नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 99999999999 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , 35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय – तेज खबर

तेज खबर

Latest Online Breaking News

35 वर्षीय महिलेचा शेतात मृतदेह सापडला, डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
[google-translator] [simple-author-box]

अमरावती : शेतात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात हा प्रकार घडला. धारणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पाहून अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड ठेचून या महिलेची हत्या केल्याचा आरोप होत आहे. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. महिलेची हत्या कोणी केली, हे अजून समजलेलं नाही. हत्येचं कारणही अस्पष्ट आहे.

काय आहे प्रकरण?

35 वर्षीय महिलेचा मृतदेह अमरावती जिल्ह्यातील धारणी पासून 20 किमी अंतरावर असलेल्या बिजुधावडी ते हातिदा गावादरम्यानच्या शेतात सापडला. धारणी पोलिसांना घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.

डोक्यात दगड घालून हत्येचा संशय

महिलेच्या मृतदेहाची अवस्था पाहता डोक्यात दगड घालून तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी गोहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व पोलीसाचे पथक या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महिलेची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या पोलीस पाटलांना घटनास्थळी बोलवण्यात आले आहे, तसेच डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक लॅबच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. धारणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space

[wonderplugin_carousel id="1"]

मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
[responsivevoice_button voice="Hindi Female"] Visit counter For Websites