नमस्कार 🙏 आमच्या न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे... येथे तुम्हाला ताज्या घडामोडी व बातम्या मिळतील... बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क - +91 99999999999 करा. आमचे YouTube चॅनेल, Facebook, Telegram ला सबस्क्राईब/ लाईक करा. , द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत देश लवकरच अव्वल स्थानी असेल ; आनंदी देशांच्या यादीवरून राहुल गांधींचा केंद्राला टोला – तेज खबर

तेज खबर

Latest Online Breaking News

द्वेष आणि रागाच्या क्रमवारीत देश लवकरच अव्वल स्थानी असेल ; आनंदी देशांच्या यादीवरून राहुल गांधींचा केंद्राला टोला

😊 कृपया ही बातमी शेअर करा😊
[google-translator] [simple-author-box]

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीत भारताचा शेवटून 15 वा क्रमांक आहे. आता या यादीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. लवकरच आपला देश द्वेश आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असेल, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या वार्षिक आनंद निर्देशांकाची यादी राहुल गांधी यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. “हंगर रैंक (Hunger Rank) 101, स्वातंत्र्य क्रमांक 119 आणि आनंदी देशांच्या यादीत भारत 136 व्या स्थानी आहे. परंतु, आम्ही लवकरच द्वेश आणि रागाच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असू शकतो” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

संयुक्त राष्ट्राने शुक्रवारी जगातील आनंदी देशांची यादी जाहीर केली आहे. आनंदाचा निर्देशांक मोजण्यासाठी त्या देशातील लोकांचे वैयक्तिक पातळीवरील समाधान, त्या देशातील लोकांचं चांगलं राहणीमान, देशाचा जीडीपी आणि त्या देशातील आयुर्मानाचा विचार केला जातो. या सर्व गोष्टींचे मुल्यमापन करून तो देश किती आनंदी आहे हे ठरवले जाते. जगातील दीडशे देशांचे या सर्व गोष्टींच्या आधारे मुल्यमापन केले जाते आणि त्यामधून देशांना क्रमांत दिले जातात. यंदा 146 देशांचे मुल्यांकन करण्यात आले आहे. यामध्ये भारत 136 व्या स्थानी आहे.

फिनलंड हा सलग पाचव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश आहे. तर अफगाणिस्तान सर्वात दु:खी देश आहे. डेन्मार्क, आइसलँड, स्वित्झर्लंड आणि नेदरलँड हे देश पहिल्या पाचमध्ये सर्वात आनंदी देश आहेत. तर अमेरिका 16 व्या आणि ब्रिटन 17 व्या क्रमांकावर आहे. सर्बिया, बल्गेरिया आणि रोमानिया या देशांत चांगले जीवन जगण्यात सर्वाधिक वाढ झाली आहे. वर्ल्ड हॅपीनेस टेबलमध्ये सर्वात मोठी घसरण लेबनॉन, व्हेनेझुएला आणि अफगाणिस्तानच्या क्रमांकामध्ये झाली आहे.

Whatsapp आयकॉन दाबून ही बातमी शेअर करा 

Advertising Space

[wonderplugin_carousel id="1"]

मुक्त आणि खऱ्या पत्रकारितेसाठी ती कॉर्पोरेट आणि राजकीय नियंत्रणापासून मुक्त असणे आवश्यक आहे. लोक पुढे येऊन सहकार्य करतील तेव्हाच हे शक्य आहे.

आता दान करा

लाइव कैलेंडर

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
[responsivevoice_button voice="Hindi Female"] Visit counter For Websites